Episodes

  • IC814 या प्रवासी भारतीय विमानाच्या अपहरणाची कहाणी
    Feb 5 2022
    दोन व्यक्ती विमानातून धावत आल्या. “ते ओरडत होते, ‘खाली झुका, खाली झुका'” थरथर कापत सुभाष कुमार त्या घटना आठवत होते. अपहरणकर्त्यांच्या या मागणीवर बर्‍याच प्रवाश्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि म्हणून अपहरणकर्त्यांनी अशा सर्व प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच विमानावर अपहरणकर्त्यांनी पूर्णपणे ताबा मिळवला. आयसी८१४ या इंडियन एयरलाइन्सच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य माहिती सांगणारे ‘IC 814 Hijacked – The inside story’’ पुस्तक
    Show More Show Less
    14 mins
  • विजयनगर साम्राज्याच्या खजिन्याचे रहस्य
    Jan 13 2022
    स १३३६ मध्ये वज्रासारख मन आणि पोलादी मनगट असलेल्या हरीहरराय आणि बुक्कराय या दोन भावांनी गोदावरी पासून ते कावेरी पर्यंत एक साम्राज्य उभे केले. तेच ते ‘विजयनगर साम्राज्य‘! कालांतराने या साम्राज्याला उतरती कळा लागली आणि त्यावेळी विजयनगर साम्राज्याची अफाट संपत्ती वाचवण्यासाठी विजयनगरचा शेवटचा सम्राट राजा रामरायाने ही सर्व संपत्ती सोळाशे हत्तींवर लादून एका गुप्त ठिकाणी लपवली.
    Show More Show Less
    10 mins
  • 1962 मधील चीन विरुद्धच्या पराभवाची स्फोटक कारणे
    Jan 13 2022
    १९६२च्या युद्धातील पराभव हा एक राष्ट्रीय पराभव आहे ज्यासाठी प्रत्येक भारतीय जबाबदार आहे. हे सरकारी उच्च पातळीवरील अपयश आहे, विरोधकांचे अपयश आहे, लष्कराच्या उच्च पातळीचे अपयश आहे (ज्यामध्ये माझा पण समावेश आहे), हे जबाबदार प्रसारमाध्यमे आणि जनतेचे पण अपयश आहे. सरकारसाठी हा पराभव म्हणजे सर्व पातळीवरील हिमालयीन घोडचूक आहे.” ‘Himalayan Blunder’ हे पुस्तक जवळपास ५३-५४ वर्षांपूर्वी लिहिले असले तरी यात नमूद केलेले मुद्दे अगदी आजही तितकेच महत्वपूर्ण आहेत.
    Show More Show Less
    13 mins