कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast) cover art

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

Written by: Kirtan Vishwa
Listen for free

LIMITED TIME OFFER | Get 2 Months for ₹5/month

About this listen

कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे.  गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत. 
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे. कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा  यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे पॉडकास्ट प्रदर्शित करण्यात येतील. यामध्ये नारदीय कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, वारकरी कीर्तन, तुकडोजी महाराज संप्रदाय कीर्तन, रामदासी संप्रदाय कीर्तन, हरिकथा कीर्तन, दासगणू महाराज संप्रदाय कीर्तन, वैज्ञानिक किर्तन, अन्य संप्रदाय कीर्तन प्रकारांचे सादरीकरण करण्यात येईल.

Kirtan Pravachan is a very rich tradition in Maharashtra and the country. The kirtan tradition has contributed immensely to the enrichment of Indian cultural, religious and spiritual life. Over the last hundreds of years, thousands of kirtankars have worked to nurture the cultural, emotional and mental well-being of many generations.
Kirtan is a great way to spread the message of God, country and religion, to educate the youth. Apart from entertainment, kirtan also introduces us to music, dance, literature, art, history, culture and traditions. Kirtan has an extraordinary power to turn human life around. Podcasts of various types of kirtans will be presented to inculcate love and awareness about kirtan, especially among the younger generation. In this Naradiya Kirtan, Rashtriya Kirtan, Warkari Kirtan, Tukdoji Maharaj Sampraday Kirtan, Ramdasi Sampraday Kirtan, Harikatha Kirtan, Dasganu Maharaj Sampraday Kirtan, Scientific Kirtan, other Sampraday Kirtan types will be presented.

Hinduism Hygiene & Healthy Living Music Psychology Psychology & Mental Health Self-Help Social Sciences Spirituality Success World
Episodes
  • संसाराचे सार काय ? । ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे
    May 2 2022
    दगडातून सुध्दा परमात्म्याला प्रकट व्हायला लावणारी संतांची अनुपम भक्ती महाराष्ट्र देशाने पाहिली आहेच. अलौकिक अशी संतांची मांदियाळी या महाराष्ट्र देशात जन्माला आली आहे. मनुष्य देहाचे महत्त्व संतां एवढ्या चांगल्या पद्धतीने आजपर्यंत कोणीच सांगितलेली नाही. येवोनिया नरदेहा विचारावे सार, सार म्हणजेच नरदेहाचे सार्थक विचारणे होय. वारकरी संप्रदायाच्या आणि संत साहित्याचे अभ्यासक, ओघवती वाणी आणि रंजनात्मक प्रबोधन ही खासियत असणारे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. श्री वासुदेव बुवा बुरसे आज आपल्याला उलगडून सांगणार आहेत
    Show More Show Less
    56 mins
  • नरसी मेहत्याची लाडी । ह.भ.प. स्मिताताई आजेगांवकर
    Apr 25 2022
    अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने नामयोगी ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा हा सुंदर उपदेश. अभिमान, अहंकार सोडावा असा उपदेश सर्व संतांनी केला आहे. ऐहिक जगातील ज्याचा ज्याचा अभिमान धरावा ते ते सारे नाशिवंत आहे. अभिमान धरायचा तर तो, संनितीचा धरावा असा संदेश स्मिता ताईंनी या कीर्तनाद्वारे दिला आहे. गुर्जर प्रांतातील संत श्री नरसी मेहता यांच्या चरित्रातील एक प्रसंग येथे आख्यानात रंगवला आहे. यातील स्त्री गीतांच्या चाली संगीत जाणकारांनी विशेष पाहण्या सारख्या आहेत. अशा सुंदरसुंदर गीतवैविध्याने नटलेले हे दासगणू सांप्रदायिक कीर्तन स्मिताताईंकडून ऐकुया...
    Show More Show Less
    1 hr and 6 mins
  • बाल मीराबाई चरित्र । ह.भ.प. स्मिताताई आजेगांवकर
    Apr 18 2022
    दासगणू कीर्तन परंपरेमध्ये एक प्रथा अशी आहे की रामकृष्ण हरी असे नमन नं म्हणता रामदास माय माझी असे पद म्हणावे. किंवा उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागेच्या तटी , हे पांडुरंग स्तुतीचे पद म्हणावे. दासगणू महाराज हे साईबाबांचे भक्त होते. त्यामुळे या कीर्तनाच्या मध्यंतरात ' साई रहम नजर करना ' असे पद गायले जाते या सर्व कीर्तन वैशिष्ट्यांसह एक सुंदर दासगणू सांप्रदायिक कीर्तन स्मिताताई आजेगावकर सादर करणार आहेत. मीरा बाईंच्या बालपणीच त्यांनी आपल्या भक्तीची थोरवी, आपल्या आई वडिलांना पटवून दिली. अशा संत मीराबाईंच्या बालपणातील एक प्रसंग यातील आख्यानात रंगवला आहे.
    Show More Show Less
    55 mins
No reviews yet