• ओडिसी एक अविरत परंपरा | Marathi Podcast
    May 6 2021
    ओडिसी ही सुद्धा मंदिरांमध्ये जपली गेलेली एक सुंदर नृत्यशैली आहे. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात  ओडिसी  नृत्याचा उल्लेख एक शास्त्रीय नृत्यप्रकार म्हणून केला असून हा नृत्यप्रकार ‘ओडू’ म्हणजे ओरिसाकडून आला आहे. शिवाय, हा भारतातील एक अत्यंत पुरातन नृत्यप्रकार मानला जातो. तिचा वैभवशाली इतिहास आणि प्रवास जाणून घेऊया आजच्या भागात.
    Show More Show Less
    15 mins
  • मन मोहिनी | Marathi Podcast
    Apr 27 2021
    केरळची मोहिनीअट्टम नृत्यशैली ही कायमच तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. पण, तिच्यावर कथकली आणि भरतनाट्यमचा प्रभाव आहे असं बऱ्याचदा म्हटलं जातं. काय असेल या मागचं कारण आणि पार्श्वभूमी हे सगळं जाणून घेऊया आजच्या भागात.
    Show More Show Less
    15 mins
  • लयदार मणिपुरी | Marathi Podcast
    Apr 17 2021
    मणिपुरी नृत्यशैली ही इतर शास्त्रीय नृत्यशैलींपेक्षा खूप वेगळी आहे. एक धार्मिक पूजा म्हणून हिचं सादरीकरण मणिपूर मध्ये केलं जायचं. पण आता रंगमंचावरही हे नृत्य सादर केलं जातं. याच बाबतीत आपण जाणून घेऊया आजच्या भागात.
    Show More Show Less
    15 mins
  • कथोपजीवी कथक | Marathi Podcast
    Apr 6 2021
    कथकचा प्रवास हा सुरु झाला कथेपासून.... ती नाचून गाऊन, अभिनय करून नर्तक लोकांपर्यंत पोचवायचे. आणि म्हणूनच कथकांकडून केलं जाणारं हे नृत्य, कथक या नावाने ओळखलं जाऊ लागलं. आजच्या भागात आपण जाणून घेऊया, याचा प्रवास नक्की कधी आणि कसा सुरू झाला असेल याबाबद्दल.
    Show More Show Less
    14 mins
  • दासी अट्टम ते भरतनाट्यम | Marathi Podcast
    Mar 27 2021
    आज भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींचा प्रसार जगभरात झालाय. त्यांची सुरुवात कशी आणि कुठे झाली, काय आहे यामागचा इतिहास कसा आहे त्यांचा प्रवास हे आपण या सिरीजमधून जाणून घेऊया. पण आजच्या भागात जाणून घेणार आहोत, भरतनाट्यम नृत्यशैलीचा आतापर्यंतचा प्रवास.
    Show More Show Less
    17 mins
  • प्रवास... नृत्यशैलींचा | Marathi Podcast (Trailer)
    1 min