RAJ'KARAN PODCAST : श्रीधर नाईकांच्या हत्येने कोकण हादरलं; राणेंवर आरोप, कोर्टात खटला अन् निकालाने बदललं राजकारण! cover art

RAJ'KARAN PODCAST : श्रीधर नाईकांच्या हत्येने कोकण हादरलं; राणेंवर आरोप, कोर्टात खटला अन् निकालाने बदललं राजकारण!

RAJ'KARAN PODCAST : श्रीधर नाईकांच्या हत्येने कोकण हादरलं; राणेंवर आरोप, कोर्टात खटला अन् निकालाने बदललं राजकारण!

Listen for free

View show details
कोकणच्या राजकारणात एकेकाळी तरुण नेतृत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून श्रीधर नाईक यांची ओळख होती. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्गात संघटन उभं केलं आणि अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेने काँग्रेसला धक्का बसला आणि त्याच काळात नारायण राणे विजयी झाले. त्यानंतर 1991 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी श्रीधर नाईकांकडे आली आणि काँग्रेसचा मोठा विजय झाला. मात्र काही महिन्यांतच कणकवली बाजारपेठेत त्यांची हत्या झाली. या प्रकरणात 13 जणांवर आरोप झाले, त्यात नारायण राणेंचाही समावेश होता. 1997 मध्ये राणेंसह नऊ जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. या हत्याकांडानंतर कोकणातील राजकीय संघर्षाला वेगळं वळण मिळालं. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shridhar Naik, Narayan Rane, Konkan Politics, Sindhudurg Politics, Shridhar Naik Murder, Maharashtra Politics, Youth Congress, Kankavli Murder Case, Political History Maharashtra, Konkan Political Rivalry
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet