• RAJ'KARAN PODCAST : नेहरुंच्या आदेशावर रफिक झकेरिया मराठवाड्यात गेले अन् औरंगाबाद खेड्याला शहर बनवलं...
    Oct 16 2026
    पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आग्रहावरून मराठवाड्यात आलेल्या डॉ. रफिक झकेरिया यांनी औरंगाबादच्या विकासाला नवी दिशा दिली. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे नेते गोविंदभाई श्रॉफ यांच्याविरोधात निवडणूक लढवून त्यांनी विजय मिळवला. पुढे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यापासून औद्योगिक विकासापर्यंत अनेक महत्त्वाच्या उपक्रमांना चालना दिली. पडझड झालेल्या ऐतिहासिक परिसरात शिक्षणाची संधी निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं आणि मौलाना आझाद एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक संकुल उभारलं. लंडनमधील उच्च शिक्षण, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील भारताची बाजू आणि धर्मनिरपेक्ष विचारांची बांधिलकी अशा अनेक पैलूंनी समृद्ध असलेला हा प्रवास जाणून घ्या. आधुनिक औरंगाबादच्या जडणघडणीत डॉ. रफिक झकेरिया यांचं योगदान नेमकं काय होतं, याचा वेध घेणारा हा विशेष ऑडिओ पॉडकास्ट! KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Rafiq Zakaria, Jawaharlal Nehru, Aurangabad History, Marathwada Politics, Modern Aurangabad, Maulana Azad Educational Trust, Maharashtra Politics, Indian Secularism, CIDCO Aurangabad, Political History
    Show More Show Less
    10 mins
  • RAJ'KARAN PODCAST : थेट अंबानींच्या प्रकल्पाला भिडले... एन. डी. पाटलांनी रायगडच्या शेतकऱ्यांसाठी असा लढा उभा केला की रिलायन्सलाही माघार घ्यावी लागली!
    Oct 9 2026
    एन. डी. पाटील म्हणजे सत्तेच्या खुर्चीपेक्षा शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा लढवय्या नेता. रायगडमधील SEZ प्रकल्पासाठी हजारो एकर शेतजमीन जाण्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा एन. डी. पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत आंदोलनाची धुरा हाती घेतली. कायदेशीर अभ्यास, मोर्चे, सभा आणि सातत्यपूर्ण संघर्षाच्या माध्यमातून त्यांनी हा लढा उभा केला. या आंदोलनामुळे सरकार आणि रिलायन्सला प्रकल्पातून माघार घ्यावी लागल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या स्रोतांनी नमूद केले आहे. या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया एन. डी. पाटील यांच्या संघर्षाची ही धगधगती कहाणी आणि त्यांच्या साध्या पण असामान्य जीवनातील काही किस्से.
    Show More Show Less
    9 mins
  • RAJ'KARAN PODCAST : विधानसभेच्या अध्यक्षांवरच पेपरवेट फेकला... आणि त्यानंतर विधानसभेच्या टेबलवरून पेपरवेटच गायब झाले!
    Oct 2 2026
    विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकणारा आमदार, तुरुंगातून निवडणूक जिंकणारा नेता, काँग्रेसच्या दिग्गज मंत्र्यांना थेट आव्हान देणारा राजकारणी आणि स्वतंत्र विदर्भासाठी आयुष्यभर लढणारा ‘विदर्भाचा शेर’ म्हणजे जांबुवंतराव धोटे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक धक्कादायक आणि रंजक किस्से घडले. 1964 मध्ये विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकल्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द झालं; मात्र तुरुंगात असतानाही जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिलं. बाळासाहेब ठाकरे आणि नामदेव ढसाळ यांच्यासोबतचं त्यांचं राजकीय नातंही विशेष चर्चेत राहिलं. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा त्यांनी अखेरपर्यंत लावून धरला. त्यांच्या बंडखोर राजकारणाची, संघर्षाची आणि राजकीय प्रवासाची ही कहाणी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Jambuwantrao Dhote, Jambuwantrao Dhote History, Vidarbha Politics, Vidarbha Tiger, Maharashtra Politics, Jambuwantrao Dhote Biography, Maharashtra Political History, Balasaheb Thackeray, Forward Bloc, Separate Vidarbha
    Show More Show Less
    9 mins
  • RAJ'KARAN PODCAST : श्रीधर नाईकांच्या हत्येने कोकण हादरलं; राणेंवर आरोप, कोर्टात खटला अन् निकालाने बदललं राजकारण!
    Sep 25 2026
    कोकणच्या राजकारणात एकेकाळी तरुण नेतृत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून श्रीधर नाईक यांची ओळख होती. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्गात संघटन उभं केलं आणि अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेने काँग्रेसला धक्का बसला आणि त्याच काळात नारायण राणे विजयी झाले. त्यानंतर 1991 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी श्रीधर नाईकांकडे आली आणि काँग्रेसचा मोठा विजय झाला. मात्र काही महिन्यांतच कणकवली बाजारपेठेत त्यांची हत्या झाली. या प्रकरणात 13 जणांवर आरोप झाले, त्यात नारायण राणेंचाही समावेश होता. 1997 मध्ये राणेंसह नऊ जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. या हत्याकांडानंतर कोकणातील राजकीय संघर्षाला वेगळं वळण मिळालं. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shridhar Naik, Narayan Rane, Konkan Politics, Sindhudurg Politics, Shridhar Naik Murder, Maharashtra Politics, Youth Congress, Kankavli Murder Case, Political History Maharashtra, Konkan Political Rivalry
    Show More Show Less
    10 mins
  • RAJ'KARAN PODCAST : कट्टर विरोधक ते काँग्रेसचा मंत्री : यशवंतराव मोहितेंच्या ‘त्या’ एका सहीमागची भन्नाट राजकीय कहाणी
    Sep 18 2026
    काँग्रेसच्या धोरणांना विरोध करत शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे यशवंतराव मोहिते पुढे काँग्रेसमध्ये कसे आले? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या मोहितेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी काय भूमिका बजावली? एप्रिल 1960 मध्ये मजदूर किसान पक्ष विसर्जित केल्यानंतर मोहिते थेट काँग्रेसमध्ये येतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांचा प्रवेश वेगळ्याच पद्धतीने झाला. कोयना धरणाच्या पाहणीसाठी आलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी थेट विचारलं, ‘काँग्रेसचे सभासद कधी होणार?’ आणि त्यानंतर काही क्षणांतच मोहितेंनी काँग्रेस सदस्यत्वावर सही केली. या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या मोहितेंच्या काँग्रेस प्रवेशाची संपूर्ण राजकीय कहाणी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Yashwantrao Mohite, Yashwantrao Mohite Congress Entry, Yashwantrao Chavan, Jawaharlal Nehru, Congress Maharashtra Politics, Shetkari Kamgar Paksha, Samyukta Maharashtra Movement, Maharashtra Politics History, Yashwantrao Mohite Biography, Maharashtra Congress History
    Show More Show Less
    8 mins
  • RAJ'KARAN PODCAST : एका मराठी माणसाच्या हाकेवर पंजाबमध्ये 1 लाख शेतकरी जमले... राज्यपालांना 6 दिवसं घरातचं अडकवून ठेवलं होतं
    Sep 11 2026
    स्वित्झर्लंडमधलं आरामदायी आयुष्य सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भारतात परतलेले शरद जोशी पुढे देशातील मोठे शेतकरी नेते बनले. शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून त्यांनी कांदा, ऊस आणि वीज दराच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलनं उभी केली. 1984 मध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांसोबत चंदीगडच्या राजभवनाला घातलेल्या घेरावाने तर देशाचं लक्ष वेधून घेतलं. जवळपास एक लाख हिंदू-शीख शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आणि सहा दिवस राजभवनाचा घेराव सुरू राहिला. राज्यपालांनी गुपचूप बाहेर पडल्यावर निर्माण झालेला तणाव शरद जोशींनी शांततेने हाताळला. शेतकरी संघटनेपासून राज्यसभा खासदारकीपर्यंतचा त्यांचा प्रवास आणि अत्यंत साधं वैयक्तिक आयुष्य या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Sharad Joshi, Sharad Joshi Farmer Leader, Shetkari Sanghatana, Punjab Farmers Protest, Chandigarh Raj Bhavan Protest, Maharashtra Farmer Movement, Sharad Joshi Biography, Indian Farmer Movement, Farmers Protest History, Sharad Joshi Politics
    Show More Show Less
    11 mins
  • RAJ'KARAN PODCAST : मंत्रिपद नाकारलेल्या विलासरावांनी अंतुलेंकडून लातूर जिल्हा मागितला; २५ वर्षांनी केली होती कृतज्ञतेची परतफेड
    Sep 4 2026
    १९८० मध्ये बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाले, पण विलासराव देशमुखांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. नाराज असलेल्या विलासरावांनी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या सल्ल्याने अंतुलेंचा लातूरमध्ये भव्य सत्कार आयोजित केला. याच कार्यक्रमात विलासरावांनी अंतुलेंकडे एक मागणी केली—लातूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्या. अंतुलेंनी व्यासपीठावरून क्षणार्धात ही मागणी मान्य केली. प्रशासकीय अडचणींवर मात करत १९८२ मध्ये लातूर स्वतंत्र जिल्हा झाला. तब्बल २५ वर्षांनी, २००७ मध्ये मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुखांनी लातूरच्या रौप्य महोत्सवासाठी अंतुलेंना विशेष निमंत्रित करून त्यांच्या योगदानाचा सन्मान केला. नाराजीपासून सुरू झालेली ही कथा पुढे राजकीय कृतज्ञतेच्या भावनिक नात्यात बदलली. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, A R Antulay, Vilasrao Deshmukh, Latur District, Latur District Formation, Maharashtra Politics, Maharashtra Political History, Latur History, Abdul Rahman Antulay, Vilasrao Deshmukh Biography, Maharashtra Chief Ministers
    Show More Show Less
    11 mins
  • RAJ'KARAN PODCAST : 11 वेळा आमदार झालेले गणपतआबा 1999 मध्ये मुख्यमंत्री होता होता राहिले
    Aug 28 2026
    ११ वेळा एकाच मतदारसंघातून आमदार होण्याचा विक्रम करणारे गणपतराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अभ्यासू वृत्तीचं प्रतीक होते. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा आयुष्यभर खांद्यावर घेत त्यांनी सांगोल्याचं तब्बल ५५ वर्ष प्रतिनिधित्व केलं. दोन वेळा मंत्री झाले, मात्र १९९९ मध्ये त्यांचं नाव थेट मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलं होतं. त्यांच्या पक्षाचे फक्त तीन आमदार असतानाही गणपतरावांना मुख्यमंत्री करण्याचा विचार झाला आणि त्यावर सहमतीही झाली होती, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मात्र हे समीकरण प्रत्यक्षात आलं नाही. या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया गणपतआबांच्या राजकीय प्रवासाची आणि त्या अपूर्ण राहिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या गोष्टीची कहाणी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Ganpatrao Deshmukh, Ganpat Aaba, Maharashtra Politics, 11 Time MLA, Sangola Politics, Shetkari Kamgar Paksha, Maharashtra Chief Minister, 1999 Maharashtra Politics, Ganpatrao Deshmukh Biography, Maharashtra Political History
    Show More Show Less
    10 mins