"राज"कारण " Rajkaran cover art

"राज"कारण " Rajkaran

"राज"कारण " Rajkaran

Written by: Sakal Media
Listen for free

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट, ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple Political Science Politics & Government Social Sciences World
Episodes
  • RAJ'KARAN PODCAST : नेहरुंच्या आदेशावर रफिक झकेरिया मराठवाड्यात गेले अन् औरंगाबाद खेड्याला शहर बनवलं...
    Oct 16 2026
    पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आग्रहावरून मराठवाड्यात आलेल्या डॉ. रफिक झकेरिया यांनी औरंगाबादच्या विकासाला नवी दिशा दिली. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे नेते गोविंदभाई श्रॉफ यांच्याविरोधात निवडणूक लढवून त्यांनी विजय मिळवला. पुढे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यापासून औद्योगिक विकासापर्यंत अनेक महत्त्वाच्या उपक्रमांना चालना दिली. पडझड झालेल्या ऐतिहासिक परिसरात शिक्षणाची संधी निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं आणि मौलाना आझाद एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक संकुल उभारलं. लंडनमधील उच्च शिक्षण, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील भारताची बाजू आणि धर्मनिरपेक्ष विचारांची बांधिलकी अशा अनेक पैलूंनी समृद्ध असलेला हा प्रवास जाणून घ्या. आधुनिक औरंगाबादच्या जडणघडणीत डॉ. रफिक झकेरिया यांचं योगदान नेमकं काय होतं, याचा वेध घेणारा हा विशेष ऑडिओ पॉडकास्ट! KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Rafiq Zakaria, Jawaharlal Nehru, Aurangabad History, Marathwada Politics, Modern Aurangabad, Maulana Azad Educational Trust, Maharashtra Politics, Indian Secularism, CIDCO Aurangabad, Political History
    Show More Show Less
    10 mins
  • RAJ'KARAN PODCAST : थेट अंबानींच्या प्रकल्पाला भिडले... एन. डी. पाटलांनी रायगडच्या शेतकऱ्यांसाठी असा लढा उभा केला की रिलायन्सलाही माघार घ्यावी लागली!
    Oct 9 2026
    एन. डी. पाटील म्हणजे सत्तेच्या खुर्चीपेक्षा शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा लढवय्या नेता. रायगडमधील SEZ प्रकल्पासाठी हजारो एकर शेतजमीन जाण्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा एन. डी. पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत आंदोलनाची धुरा हाती घेतली. कायदेशीर अभ्यास, मोर्चे, सभा आणि सातत्यपूर्ण संघर्षाच्या माध्यमातून त्यांनी हा लढा उभा केला. या आंदोलनामुळे सरकार आणि रिलायन्सला प्रकल्पातून माघार घ्यावी लागल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या स्रोतांनी नमूद केले आहे. या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया एन. डी. पाटील यांच्या संघर्षाची ही धगधगती कहाणी आणि त्यांच्या साध्या पण असामान्य जीवनातील काही किस्से.
    Show More Show Less
    9 mins
  • RAJ'KARAN PODCAST : विधानसभेच्या अध्यक्षांवरच पेपरवेट फेकला... आणि त्यानंतर विधानसभेच्या टेबलवरून पेपरवेटच गायब झाले!
    Oct 2 2026
    विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकणारा आमदार, तुरुंगातून निवडणूक जिंकणारा नेता, काँग्रेसच्या दिग्गज मंत्र्यांना थेट आव्हान देणारा राजकारणी आणि स्वतंत्र विदर्भासाठी आयुष्यभर लढणारा ‘विदर्भाचा शेर’ म्हणजे जांबुवंतराव धोटे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक धक्कादायक आणि रंजक किस्से घडले. 1964 मध्ये विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकल्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द झालं; मात्र तुरुंगात असतानाही जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिलं. बाळासाहेब ठाकरे आणि नामदेव ढसाळ यांच्यासोबतचं त्यांचं राजकीय नातंही विशेष चर्चेत राहिलं. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा त्यांनी अखेरपर्यंत लावून धरला. त्यांच्या बंडखोर राजकारणाची, संघर्षाची आणि राजकीय प्रवासाची ही कहाणी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Jambuwantrao Dhote, Jambuwantrao Dhote History, Vidarbha Politics, Vidarbha Tiger, Maharashtra Politics, Jambuwantrao Dhote Biography, Maharashtra Political History, Balasaheb Thackeray, Forward Bloc, Separate Vidarbha
    Show More Show Less
    9 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet