• वॉर टाईम: संजय सोनवणी (नमुना प्रकरण)
    Oct 14 2026

    नुकतेच प्रकाशित झालेले ऑडीओ बुक. प्रख्यात लेखक संजय सोनवणी लिखीत 'वॉर टाईम'. भारत आणि पाक युद्धाच्या पवित्र्यात असतानाच चीन ने पाकिस्तानचा घास घेण्यासाठी आपली सेना पाकिस्तानात पाठवली. त्यानंतर भारत - पाक - चीन - अमेरिका कसे डावपेच आखतात ह्यावर एक वेगळी कादंबरी. नक्की ऐकावी अशी. संचित वर्तकांच्या आवाजात, फक्त स्टोरीटेल app वर. येथे ऐका नमुना प्रकरण.

    Show More Show Less
    8 mins
  • मेंदूतील डिफॉल्ट मोड: यश वेलणकर (नमुना प्रकरण)
    Oct 7 2026

    मनःशांतीसाठी मनाला जाणणे आवश्यक आहे आणि मन जाणण्यासाठी मेंदूचे कार्य कसे चालते हे पहाणेही आवश्यक आहे. मेंदूचे कार्य कसे चालते याची माहिती घेऊन मेंदूचा डिफॉल्ट मोड कळला की मन प्रसन्न राखण्यासाठी त्याला कशा सूचना द्यायच्या याच्या माईंडफूलनेस तंत्राची माहिती यश वेलणकर यांनी येथे दिली आहे. ऐका फक्त स्टोरीटेल app वर. येथे ऐका नमुना प्रकरण.

    Show More Show Less
    19 mins
  • लक्ष देण्याचे कौशल्य: यश वेलणकर (नमुना प्रकरण)
    Sep 30 2026

    यशस्वी होण्यासाठी एकाग्रता असणे खूपच गरजेचे आहे. एकाग्रतेतून कार्यक्षमता वाढते.
    पण मन चंचल असते त्यामुळे या चंचल मनाला एकाग्र होण्याचे प्रशिक्षण देऊन स्वतःमध्ये लक्ष देण्याचे कौशल्य विकसित करता येते.
    माईंडफूलनेस तंत्राचा वापर करून हे कसे साधायचे याबद्दल यश वेलणकर माहिती देत आहेत.
    ऐका आजच स्टोरीटेल app वर. येथे ऐका नमुना प्रकरण.

    Show More Show Less
    20 mins
  • मन में है विश्वास: विश्वास नांगरे पाटील (नमुना प्रकरण)
    Sep 23 2026

    पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील लिखित ‘मन में है विश्वास’ या आत्मकथनपर पुस्तक.
    स्वतःविषयी खरं लिहिणं हा जीवघेणा अनुभव असतो तरीही विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वतःला मोकळेपणाने व्यक्त केलंय.
    पल्या कुटुंबाची, समाजाची पुनर्तपासणी केलीय, नात्यागोत्यातील उभ्या-आडव्या धाग्यांचा छेद घेऊन उकल केलीये. अ
    त्यंत प्रत्ययकारी भाषेत असलेले हे आत्मकथन लेखकाच्या प्रगल्भ मनाची जाणीव करून देते.
    ऐका आजच विश्वास नांगरे पाटील यांच्या आवाजात स्टोरीटेल app वर. इथे ऐका नमुना प्रकरण.

    Show More Show Less
    12 mins
  • वेशिपलीकडे: सुहास शिरवळकर veshipalikade: Suhas Shirvalkar
    Sep 16 2026

    जेथे विज्ञानाचा तर्क संपतो, तिथून 'वेशीपलीकडे'चे जग सुरू होते! सुहास शिरवळकर यांची ही कादंबरी तुम्हाला एका अशा गूढ विश्वात घेऊन जाते, जिथे अतर्क्य घटना आणि अदृश्य शक्तींचा वावर आहे. गावाच्या वेशीबाहेर दडलेली ती जुनी रहस्ये आणि काळजाचा ठोका चुकवणारे ते अनुभव... हे सर्व विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे नाही, तर केवळ अनुभवण्याचे आहे. एका साध्या प्रवासाचे रूपांतर जेव्हा भीतीच्या छायेत होते, तेव्हा सुरू होतो जीवघेणा संघर्ष. शिरवळकरांनी उभं केलेलं हे अतींद्रिय (Paranormal) जग तुमच्या कल्पनाशक्तीला आव्हान देईल. रात्रीच्या शांततेत ऐकताना अंगावर शहारा आणणारी ही एक उत्कृष्ट गूढकथा आहे. काय आहे त्या वेशीपलीकडचे रहस्य? जाणून घेण्यासाठी आजच ऐका 'वेशीपलीकडे' - फक्त स्टोरीटेल वर! (येथे ऐका नमुना प्रकरण सचिन सुरेश यांच्या आवजात.)

    Show More Show Less
    49 mins
  • तृतीय नेत्र: भाग २ : संजय सोनवणी Tritiya Netra: 2: Sanjay Sonawani
    Sep 9 2026

    राहुल आणि कविताची नजर चुकवून मीनाक्षी तृतीय नेत्र ताब्यात घेऊन सटकली खरी, पण तिचा प्रवास सोपा नव्हता. तरीही अपार बुद्धिमत्ता वापरत ती शत्रूना मात द्यायचा अथक प्रयत्न करत होती... आणि ज्यासाठी तिने एवढा अट्टाहास केला होता त्या तृतीय नेत्राची अखेर नियती तरी काय होती? मुळात मीनाक्षी होती तरी नेमकी कोण? तिचे काय झाले अखेर? राहुल आणि कविता आपण कष्टाने शोधलेल्या पण पुन्हा आपल्या हातातून गायब झालेल्या तृतीय नेत्राच्या शोधात जीव धोक्यात घालून पोलीस व ऍड गणेश गायकवाडच्या मदतीने कष्ट घेत होते खरे, पण उलगडले का त्यांना तृतीय रत्नाचे आणि त्यासाठी एवढा रक्तपात का चालू आहे यामागील रहस्य?
    संजय सोनवणी लिखीत या वादळी कथेत विलक्षण रहस्याने ओथंबलेल्या, चक्रावून टाकणाऱ्या, मानवी संवेदना गोठवून टाकण्याचे सामर्थ्य आहे! ऐका परी तेलंग यांच्या आवाजात स्टोरीटेल app वर. आणि इथे ऐका नमुना प्रकरण आजच.

    Show More Show Less
    55 mins
  • लूप होल: सुहास शिरवळकर (नमुना प्रकरण)
    Sep 2 2026

    कायद्याच्या चौकटीत जेव्हा एखादी छोटीशी पळवाट शोधली जाते, तेव्हा सुरू होतो 'लूप होल'चा थरार! सुहास शिरवळकर यांच्या लेखणीतून उतरलेली ही एक वेगवान आणि खिळवून ठेवणारी गुन्हेगारी कथा आहे. एक असा गुन्हा, जो अत्यंत हुशारीने नियोजित केला आहे, पण सत्याच्या प्रवासात कायद्याची एक छोटीशी 'पळवाट' सर्व काही बदलून टाकू शकते. शिरवळकरी शैलीतील संवाद, वेगवान कथानक आणि शेवटपर्यंत टिकून राहणारी उत्सुकता हे या कादंबरीचे वैशिष्ट्य. गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील हा 'माईंड गेम' आता ऑडिओबुक स्वरूपात अनुभवा. बुद्धीला चालना देणारे रहस्य आणि अंगावर काटा आणणारा थरार... आजच ऐका प्रसाद फणसे यांच्या आवाजात 'लूप होल' फक्त स्टोरीटेल वर! येथे ऐक नमुना प्रकरण!

    Show More Show Less
    16 mins
  • राधा: समर Radha : Samar (नमुना प्रकरण)
    Aug 26 2026

    श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे एक 'कादंबरीमय उपनिषद !'
    ऐक गौरी लागू यांच्या आवाजात फक्त स्टोरीटेल app वर. येथे ऐका नमुना प्रकरण.

    Show More Show Less
    54 mins