• साथ नभाची | Saath Nabhachi
    Aug 16 2024

    साथ नभाची

    कापसासारखे पांढरे शुभ्र, काळे कुट्ट, वाऱ्यासोबत पळणारे असे हे ढग आकाशात वेगळाच खेळ खेळत असतात. कधी ते सुखावतात तर कधी त्रास देतात. चला तर लागुया ढगांच्या मागे कवितांसोबत.


    1. ढग येतात

    कवी - शांता शेळके

    कवितासंग्रह - गोंदण


    2 . साथ नभाची असे

    कवी - नलेश पाटील

    कवितासंग्रह - हिरवं भान

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    Show More Show Less
    7 mins
  • पंधरा ऑगस्ट | 15 August
    Aug 9 2024

    पंधरा ऑगस्ट

    पंधरा ऑगस्ट हा भारतीय इतिहासात कोरलेला सुवर्ण दिवस. यासाठी लाखो लोकांनी स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं, त्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, बलिदान दिलं. तेव्हा कुठे हा सोनियाचा दिनु आपल्या भाळी आला. पण आपण सर्व त्यांच्या स्वतंत्र भारताच्या स्वप्नात आपली भूमिका चोखपणे पार पाडतोय का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चला तर मग साजरा करूयात स्वातंत्र्यदिन.


    1. तिरंगा

    कवी - मिलिंद जोशी

    कवितासंग्रह - असेच होतं ना तुला ही...


    2. 15 ऑगस्ट

    कवी - अशोक बागवे

    कवितासंग्रह - कवितेच्या गावा जावे


    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    Show More Show Less
    6 mins
  • अक्षरमौन | Aksharmaun
    Aug 2 2024

    अक्षरमौन

    एक चकारही न काढता ही अक्षरं बोलतात ना. या शब्दांना, अक्षरं , क्रियापदे यांना एक वेगळं वजन असतं. ते आपण कुठं, कधी आणि कसं वापरतो यावर आपण काही बनवू शकतो किंवा सगळं काही बिघडवू शकतो. चला तर मग त्यांची ताकद आजमवूया कवितांतून.


    1 . अक्षरमौन

    कवी - सौमित्र

    कवितासंग्रह - आणि तरिही मी...


    2. क्रियापद

    कवी - वसंत आबाजी डहाके

    कवितासंग्रह - चित्रलिपी

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    Show More Show Less
    5 mins
  • वास्तव | Vaastav
    Jul 26 2024

    वास्तव

    आपण सर्वजण वास्तवापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही लोक निधड्या छातीने त्याचा सामना करतात आणि एक वेगळं जग निर्माण करतात जे त्यांच्या इच्छेनुसार चालतं. चला तर करुया वास्तवाशी चार हात.


    1. वास्तव

    कवी - मंगेश पाडगावकर

    कवितासंग्रह - शब्द


    2. वास्तव

    कवी - वसंत आबाजी डहाके

    कवितासंग्रह - चित्रलिपी

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    Show More Show Less
    5 mins
  • भोवरा | Bhovara
    Jul 19 2024

    भोवरा

    कधी आपण याला फिरवतो तर तो कधी आपल्याला. भोवरे हे असतातच. खेळण्यातला भोवरा तर भाव खाऊन जातोच पण आयुष्यातले भोवरे ही काही कमी नसतात. चला तर एक गिरकी घेऊच कवितांच्या भोवऱ्यासोबत.


    1. भोवरा

    कवी - के ना डांगे

    कवितासंग्रह - बालभारती


    2. भोवरा

    कवी - इंदिरा संत

    कवितासंग्रह - निराकार

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    Show More Show Less
    5 mins
  • औदुंबर | Audumbar
    Jul 12 2024

    औदुंबर

    औदुंबर ही जागा डोळ्यांना सुखावणारी तर आहेच पण मनालाही एक वेगळीच शांती तिथे मिळते. तो घाट, हिरवळ, नदीचं झुळझुळ वाहणारं पाणी, ती सुंदर मूर्ती यांनी आपण भारवून नाही गेलो तर नवलच. चला तर दंग होऊन जाऊया आपणही औदुंबर क्षेत्री.


    1. श्री क्षेत्र औदुंबर

    कवी - बा भ बोरकर

    कवितासंग्रह - कैवल्याचे झाड


    2. औदुंबर

    कवी - प्रकाश खोटे

    कवितासंग्रह - साधना

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    Show More Show Less
    6 mins
  • सिग्नल्स | Signals
    Jul 5 2024

    सिग्नल्स

    लाल, हिरवा, पिवळा, धोका, सावधान , पुढे जा अशी असंख्य सिग्नल्स रस्त्यावरती आणि आयुष्यात आपल्याला मिळत राहतात. काही आपला जीव वाचवतात, काही आपल्याला नवीन गोष्टी शिकवतात, तर काही आयुष्य पलटून टाकतात. चला तर बघुया कोणते सिग्नल्स मिळतायत ते.

    1. सिग्नल्स

    कवी - सौमित्र

    कवितासंग्रह- बाउल


    2. ग्रीन सिग्नल

    कवी - निरंजन उजागरे

    कवितासंग्रह - कवितांच्या गावा जावे

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    Show More Show Less
    5 mins
  • विठ्ठलाची ओटी | Vithalachi Oti
    Jun 28 2024

    विठ्ठलाची ओटी

    लाखो भाविक ' जय हरी विठ्ठल ' च्या गजरात जरवर्षी हरवून जाऊन पंढरीला पोहचतात. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने त्यांना वेगळाच आनंद मिळतो. ती चंद्रभागा , तो सावळा विठ्ठल आणि ती पंढरी नेहमीच भक्तांना खुणावत असते. चला हरवून जाऊयात हरिनामाच्या गजरात.

    1. विठ्ठलाची ओटी

    कवी - वैभव जोशी

    कवितासंग्रह- म्हणजे कसं की..


    2. सांगता

    कवी - बा भ बोरकर

    कवितासंग्रह- कैवल्याचे झाड

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    Show More Show Less
    4 mins