• Episode-X "ज्योतिषशास्त्र - समज आणि "गैर" समज "
    Apr 4 2021

    बऱ्याच गोष्टींवर आपला विश्वास नसतो, आपण जर बघितलं तर एखाद्या गोष्टीवर विश्वास नसण्याचं एक कारण म्हणजे त्यात असलेला ढोंगीपणा, अनेक क्षेत्रां सारखंच ज्योतिष शास्त्रामध्ये पण ढोंगीपणा किंवा पैसे लुबाडण्याची वृत्ती ही आपल्याला सर्रास बघायला मिळते पण त्यातही ज्योतिष शास्त्र एक शास्त्र आहे आणि त्याला शास्त्राप्रमाणे बघितले पाहिजे असे सांगणारे आणि ती गोष्ट पटवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे आजचे आपले पाहुणे 

    डाॅ. श्री संदिप अवचट. 

    संदीप दादा एक ख्यातनाम ज्योतिषी तर आहेतच शिवाय ते एक उत्तम कवी देखील आहेत. आपल्या परंपरा, रिती ह्या सगळ्या गोष्टींना सायंटिफिक दृष्टिकोनातून आपल्या समोर मांडून आपल्याला त्या गोष्टींवर विश्वास बसेल ह्या करता संदीप दादा कायम प्रयत्न करत असतात. ह्या इंटरव्हिव नंतर माझा  दृष्टिकोन नक्कीच बदललाय, लवकरच गुढी पाडवा येतोय आणि गुढी उभारण्या मागचे सायंटिफिक कारण जाणून घयायचे असेल तर नक्कीच हा एपिसोड ऐका. 


    हा एपिसोड कसा वाटलं हे मला नक्की कळवा

     

    Insta Handle : https://instagram.com/beyondlimitswithpournima?igshid=1lf2qng8dylk

    https://instagram.com

    Facebook  Page: https://www.facebook.com/Beyond-Limits-with-Pournima-589590655001535

    E -mail : beyondlimitswithpournima@gmail.com  


    लोभ असावा,

    पौर्णिमा.

    Show More Show Less
    1 hr and 2 mins
  • "एक निर्णय - A Journey... "
    Jan 3 2021

              आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक दिवस असा येतो जेव्हा आपल्याला एक निर्णय स्वतःसाठी घ्यावा लागतो, ह्याच पार्श्वभूमीवर आधारित "एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी.." ह्या मूव्ही चे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, संवाद लेखक आणि यात एक भूमिका करणारे कलाकार असे अष्टपौलू व्यक्तिमत्व असणारे   आणि तीन दशकांहून अधिक काळ या स्वप्नवत चंदेरी दुनियेत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, व्हॉइस आर्टिस्ट आणि एडिटर अश्या सगळ्या भूमिका निभवत स्वबळावर भक्कमपणे उभे राहणारे आज चे आपले पाहुणे श्री. श्रीरंग देशमुख.  

    त्यांच्याशी आपण आज विविध विषयांवर चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत "एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी.." ह्या मूव्हीच्या वेळी त्यांना आलेले विलक्षण अनुभव जे आपल्याला नक्कीच खुप काही शिकवून जातात. 


    तुमचे प्रतिसाद माझ्या करता मौल्यवान आहेत. 


    Instagram Handle: https://www.instagram.com/beyondlimitswithpournima/


    Facebook Page: https://www.facebook.com/Beyond-Limits-with-Pournima-589590655001535


    Gmail: beyonglimitswithpournima@gmail.com 


    कळावे लोभ असावा... 

    Show More Show Less
    1 hr and 51 mins
  • "Success = Satisfaction and not Money...!"
    Dec 13 2020
    जेव्हा एक विद्यार्थी ग्रॅज्युएशनला जायला तयार असतो, तेव्हा प्रत्येक आईवडिलांच्या मनात येतो तो हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न, हॉस्टेलमध्ये राहायला गेल्यावर त्यांना येणारा स्ट्रेस आणि अडचणी यांच्यावर कशी मात मिळवायची? तर आज आपल्या आठव्या एपिसोड मध्ये आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत डॉक्टर राजेश्वरी रपाटा मॅम सोबत, ज्या Dean होत्या आणि त्यांनी अशा भरपूर मुलांना काउन्सिलिंग करून त्यांना ताण-तणाव आणि बाकीच्या अडचणीं मधून बाहेर यायला मदत केली आहे. हा एपीसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका beyondlimitswithpournima@gmail.com  या मेल आयडीवर किंवा Beyond Limits With Pournima ह्या माझ्या इन्स्टा https://instagram.com/beyondlimitswithpournima?igshid=1lf2qng8dylk https://instagram.com आणि फेसबुक पेज वर... तुमच्या प्रतिक्रिया माझ्या करता खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. Link for Dr. Rajeshwari Mam's Podcast on Human Anatomy https://open.spotify.com/episode/36trkNvgxKu1j0JzhvVSb1?si=aAeJ1sSQSSGEsI47Ps7FFg
    Show More Show Less
    46 mins
  • When People Behind "Swayam" Talk...!
    Nov 17 2020

    'इकिगाई' म्हणजे आपल्या जगण्याचे प्रयोजन !

    आणि ह्याच संकल्पनेतून "स्वयम् टॉक्स" घडलं आणि स्वयंच्या मदतीने कितीतरी आयुष्य बदलत आहेत, आज आपण खूप काही नवीन शिकणार आहोत स्वयम् टॉक्सचे संस्थापक श्री. नवीन काळे आणि श्री. आशय महाजन ह्यांच्या कडून, आणि जाणून घेणार आहोत हा प्रवासप्रवास कसा घडला. त्यांच्या करता प्लॅन B  म्हणजेच प्लॅन A ला A+ आणि A++ करत जणे आहे. Conscious Pain is always good... ते का ? आणि कसं ? हे कळायला हा एपिसोड ऐकावा लागेल तो नक्की ऐका. आणि तुमच्या प्रतरिक्रिया माझ्या पर्यंत नक्की पोहोचावा beyondlimitswithpournima@gmail.com ह्या ई-मेल वर. 


    Show More Show Less
    1 hr and 18 mins
  • "Think Enough"
    Oct 10 2020

    बरेचदा आपण स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारतो, मी जे आयुष्य जगते आहे त्यात मी आनंदी आहे का? कारण आपल्या करता आयुष्यात तीनच गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे आनंद, समाधान आणि यश आणि या तिन्ही गोष्टी एकमेकांच्या आधारावर गुंफल्या गेलेल्या असतात. आज आहे "वर्ल्ड मेंटल हेल्थ डे" आणि आजचा एपिसोड सुद्धा अशा दोन लोकांच्या इन्स्पिरेशनल गोष्टीवर आधारित आहे ज्या लोकांनी स्वतःला जेव्हा प्रश्न विचारला की आपण आनंदी आहोत का? त्यांना त्यांचे उत्तर आनंदाचं शेत ह्या ऍग्रो टुरिझमच्या प्रकल्पात मिळाले , ते आहेत श्री. राहुल कुलकर्णी आणि सौ . संपदा कुलकर्णी. ऐकूयात त्यांना त्यांच्या सुखाचा शोध कसा लावला? आनंद समाधान, आणि यश याची घडी किती सुंदररित्या बसवली त्यांनी बसवली आहे.

    Show More Show Less
    1 hr and 13 mins
  • CLICKING BETWEEN THE HEARTBEATS...!
    Sep 5 2020

    Lucky Jaiswal a well known macro photographer from Pune had passion for photography and then he built his way to the world of "Macro Photography..." finding the perfect "Work-Passion-Life" balance. Many of his clicks where exhibited in well known photography exhibitions like Sookshma. His clicks were published in "Sanctuary Asia".  A very humble person and an excellent guide. Don"t miss this episode. It will be a great learning for each and everyone of you.

    Show More Show Less
    39 mins
  • गगन भरारी
    Aug 15 2020

    प्रिया ज्ञानेश्वर बोडके आणि प्रमोद ज्ञानेश्वर बोडके ह्या दोघांनी त्यांच्या शेती व्यवसायाला एक आधुनिक आणि सुंदर रूप दिलंय. प्रिया हिला  शेतकरी पुरस्कार - महाराष्ट्र सिंचन सहयोग यांचा उत्कृष्ट महिला, आणि २०१६  Krushithon Nashik यांचा प्रयोगशील युवा महिला शेतकरी पुरस्कार मिळाला आहे शिवाय प्रमोद ने मेलानिकेल इंजिनीरिंग करून त्याचा वापर शेती करता केलाय. ५ लाख लोकांचा संच आज हे दोघे त्यांच्या वडिलांसोबत यशस्वी रित्या संभाळताहेत. आज चा एपिसोड मला खूप काही देऊन गेला, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटलं हे मला नक्की कळवा pornima.d@gmail.com . तुम्हाला जर शेती विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रिया बोडके-+91 87965 04477 आणि प्रमोद बोडके -+91 87965 02277 ह्यांना संपर्क करू शकता.

    Show More Show Less
    1 hr and 19 mins
  • Will Leads to Way...
    Jul 29 2020

    Sumit a successful RJ from last 5 years, but becoming RJ was not a easy task he went for engineering and he had to loose two years while pursuing his degree. Completed his degree but instead of getting a job in industry he choose to become a RJ for which again he had to struggle for 2 long years without any job. But finally his efforts and hard work paid off and from then there was no turning back... Stay in tune with "Beyond Limits with Pournima" for more such experiences.

    Thank You for Your Love...

    Show More Show Less
    39 mins