• मानसिक आरोग्याचे हक्क कोणते? | What are mental health rights?
    Oct 10 2023

    सायकॉलॉजिस्ट गौरी जानवेकर यांच्यासोबत 10 ऑक्टोबर या मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने व्यक्तीचे मानसिक आरोग्याचे हक्क काय असतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ जरूर पहा. #mentalhealth #mentalhealthawareness #mentalhealthmatters

    Show More Show Less
    28 mins
  • अल्झायमर व्यक्तीची काळजी घेताना
    Sep 27 2023

    अल्जायमर हा मेंदूशी निगडीत आजार. त्याची सुरुवात डिमेन्शिया म्हणजे विस्मरणाने सुरु होते. भारतात वयाची साठी पार असणारे जवळपास 9 लाख नागरिक डिमेन्शिया या आजारासोबत जगत आहेत. व्रतस्थ होऊन अशा पेशंटचा सांभाळ करावा लागतो आणि त्यात काही वेळा दमणूक ही वाटू शकते. पालघर येथील चिन्मयी दवे- सुभाष यांच्या आईला अल्झायमर आहे. आईचा सांभाळ करताना येणारे विविध अनुभव साथी संवाद कट्ट्यावर त्यांनी शेअर केले आहेत. जरूर पहा. #dementia #dementiasupport #alzheimer #alzheimerscaregiver #alzheimers

    Show More Show Less
    54 mins
  • योनीच्या आजारांवर बातचीत
    Sep 25 2023

    जननमार्गाला आजार-जंतुलागण झालीय, त्यावर उपाय आहे, हे महिलांना अनेकदा माहित नसतं, त्रास सांगायचा धीरही होत नाही. कुणाला सांगणार ॽ कोण ऐकणार ॽ असला त्रास पुरूष डाॅक्टरला तरी कसा सांगणार ॽ अशा समस्यांचा झगडा अनेकजणी करताहेत. सोनाली सुतारांनी आपल्या खेड्याभवतालच्या महिलांना यावर बोलतं केलंय. #reproduction #vaginainfection #birthcanal #womanvagina #vaginalhealth #vaginaldischarge #womanhealth

    Show More Show Less
    21 mins
  • आपल्या खाण्याकडे आपलं लक्ष आहे का?
    Sep 21 2023

    आपल्या रोजच्या आहारात आपण कळत नकळत किती तरी असे पदार्थ खातो पण त्यातून पोषण मिळत आहे का याचा विचार आपण करत नाही. आपल्याला तर जंक फूड आणि फास्ट फूड यातील नेमका फरक माहिती नसतो. पोषण माहच्या निमित्ताने आहारतज्ज्ञ मानसी श्रौती यांच्याशी संवाद कट्ट्यावर गप्पा मारल्या आहेत. #publichealthmatters #nutrition #nutritionmonth #nutritionfacts

    Show More Show Less
    38 mins
  • इट्स कुल टू टेक थेरपी! : शिल्पा तांबे
    Sep 20 2023

    आत्महत्येविषयी बोलूया 10 सप्टेंबर हा आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून जगभर पाळला जातो. त्या निम्मिताने कनेक्टिंग ट्रस्टच्या समन्वयक आणि समुपदेशक शिल्पा तांबे यांच्याशी गप्पा मारल्या. ताणतणाव,आत्महत्या करण्यामागील कारणे आणि तणाव कसे हाताळावेत. तज्ज्ञांची मदत कशी घ्यावी अशा विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. #publichealthmatters #suicide #suicideprevention #suicidepreventionday #mentalhealth #mentalhealthawareness

    Show More Show Less
    46 mins
  • नसबंदी कुणी करावी? - डॉ. शंतनू अभ्यंकर
    Aug 19 2023

    कुटुंब नियोजन करायचं म्हंटलं की गर्भनिरोधक गोळ्या, तांबी, इंजेक्शनं आणि शेवटी ऑपरेशन सगळं बायकांकडेच येतं. बायका मुलांना जन्म देऊ शकतात हे बरोबर आहे पण कुटुंब नियोजनसुद्धा फक्त बायकांनाच करता येतं का? बिन टाक्याच्या पुरुष नसबंदीविषयी भीती का वाटते? या विषयावरची माहिती जाणून घेऊया स्त्रीरोग तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर यांच्याकडून. #publichealthmatters #sathi #healthforall #vasectomy #tubectomy

    Show More Show Less
    29 mins
  • लेखक प्रणव सखदेव यांचा हेपाटायटिस - बी सोबतचा प्रवास
    Aug 18 2023

    २८, जुलै : वर्ल्ड हेपाटायटिस डे काविळ! वेगवेगळ्या प्रकारची असते. विविध प्रकारचे विषाणू विविध मार्गांनी काविळीचं कारण ठरतात. काही वेळा हा आजार औषधोपचारानं बरा होतो, काही वेळा कायम सोबत राहतो. लेखक प्रणव सखदेव यांचा हेपाटायटिस - बी सोबतचा प्रवास. प्रत्येकानं जाणून घ्यावा असा... ऐका साथी संवाद कट्ट्यावर #publichealthmatters #sathi #healthforall #publichealth

    Show More Show Less
    55 mins
  • ऱ्हासचक्र पुस्तकाच्या निमित्ताने
    Aug 18 2023

    वैद्यकीय व्यवसायाची अधोगती कशी झाली याची हकीकत स्त्रीरोगतज्ज्ञ अरुण गद्रे यांनी 'ऱ्हासचक्र' या पुस्तकात मांडली आहे. #publichealthmatters #sathi #books #doctor #medicine #arogyasathi #booklover

    Show More Show Less
    13 mins