Storyside Marathi - First Chapter cover art

Storyside Marathi - First Chapter

Storyside Marathi - First Chapter

Written by: Storyside India
Listen for free

तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात? 'स्टोरीसाइड मराठी: फर्स्ट चॅप्टर्स' मध्ये तुमचे स्वागत आहे! 🎧 येथे तुम्हाला मिळतील मराठीतील सर्वोत्तम ऑडिओबुक्सचे पहिले भाग अगदी मोफत. अजरामर साहित्यापासून ते थरारक क्राईम थ्रिलर्स, प्रेरणादायी चरित्रे आणि आजच्या काळातील बेस्ट-सेलर्सपर्यंत - साहित्याचा हा खजिना आता तुमच्या कानात! प्रत्येक एपिसोडमध्ये एका नव्या कथेची झलक अनुभवा. जर तुम्हाला पुढची गोष्ट ऐकायची असेल, तर आजच 'Storytel' ॲप डाउनलोड करा आणि हजारो मराठी ऑडिओबुक्सचा आनंद घ्या. Love a good story? Welcome to Storyside Marathi: First Chapters! 🎧 Get a front-row seat to the best of Marathi literature in audio. From the timeless classics to gripping crime thrillers, inspiring biographies, and modern-day bestsellers—experience the magic of storytelling on the go. In this podcast, we bring you the exclusive first chapters of our top-rated Marathi audiobooks for free. 👉 Hooked on a story? Don't stop now! Download the Storytel app to listen to the full versions of these titles and explore our massive library of Marathi audio content.@storysideindia Art
Episodes
  • डिटेक्टिव्ह अल्फा आणि ग्रामदेवतेचा प्रकोप: सौरभ वागळे (ऐका नमुना प्रकरण)
    Aug 5 2026

    मुंबईतून कोकणच्या वाटेवर जाताना समुद्रकिनारी, गर्द नारळ-आंब्यांच्या झाडांच्या कुशीत वसलेलं नावगाव हे गाव जितकं सुंदर, तितकेच तिथं राहणारे लोक चमत्कारिक. गावात देव कालभैरवाचं एक पुरातन मंदिर आहे. गावकऱ्यांची अशी समजूत आहे, की या मंदिरातला देव हा जागृत आहे. तो रात्रीच्या अंधारात मंदिराबाहेर पडतो आणि गावाचं रक्षण करतो. पण त्याची दृष्टी इतकी प्रखर आहे, की त्यात चुकून जर कोणी मनुष्य आला, तर तोही जळून भस्म होतो. या देवतेच्या भीतीने गावातले लोक रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडायला घाबरतात. अशा या नावगावातून अल्फाला एक गूढ निनावी पत्र येतं आणि मग सुरू होतो एक जीवघेणा खेळ. गावातले जुने मुरब्बी लोक एक एक करून मरायला लागतात आणि मंदिरातील देवतेचा प्रकोप झाला, अशी गावकऱ्यांची समजूत होते. डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव यांच्यासमोर आव्हान आहे, या गावात घडणाऱ्या अनैसर्गिक, दैवी वाटणाऱ्या घटनांमागचं सत्य शोधून काढण्याचं. ते हे करू शकतील का ? ऐका सौरभ वागळे लिखीत 'डिटेक्टिव्ह अल्फा आणि ग्रामदेवतेचा प्रकोप'चे नमुना प्रकरण येथे आणि पूर्ण कथा ऐका फक्त स्टोरीटेलवर कृणाल आळवेंच्या दमदार आवाजात.

    Show More Show Less
    29 mins
  • श्रीमान योगी: रणजीत देसाई (ऐका नमुना प्रकरण)
    Jul 29 2026

    रणजित देसाई यांची अजरामर कलाकृती 'श्रीमान योगी' आता एका नव्या रूपात! छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक योद्धा नव्हे, तर एक युगपुरुष, आदर्श पुत्र आणि रयतेचा राजा. त्यांच्या आयुष्यातील थरार आणि भावनांचा प्रवास म्हणजे हे महाकाव्य. अनिरुद्ध दडके यांच्या दमदार आणि ओघवत्या आवाजात ऐका स्वराज्याचा देदिप्यमान इतिहास. सह्याद्रीच्या कडांमधील पडसाद आणि महाराजांचे अलौकिक चातुर्य आता तुमच्या कानात गुंजणार आहे. एक श्रेष्ठ साहित्यिक ठेवा आणि मंत्रमुग्ध करणारी शब्दशक्ती यांचा हा अद्भूत संगम. शिवचरित्राचा हा ऑडिओ अनुभव तुमच्या संग्रही असायलाच हवा! ऐका स्टोरटेलवर! येथ ऐका एक नमुना प्रकरण.

    Show More Show Less
    1 hr and 33 mins
  • डिटेक्टिव्ह अल्फा आणि 'ब्लू मूर'चे रहस्य : सौरभ वागळे (ऐका नमुना प्रकरण)
    Jul 29 2026

    भारतीय गुप्तचर संघटनेच्या हेडक्वार्टरमधून अत्यंत गोपनीय कागदपत्रांची चोरी झाली आहे. ती कागदपत्रे चोरणारा 'रॉ'चाच एक गद्दार एजंट मनीषकुमार बेदी हा इंग्लंडमध्ये जाऊन धडकतो. बेदीला 'रॉ'चे इतर एजंट्स ठाऊक असल्याने त्याला पकडण्यासाठी 'रॉ'ला हवाय कोणीतरी त्रयस्थ गुप्तहेर आणि पहिलं नाव समोर येतं अल्फाचं ! अल्फा इंग्लंडमध्ये पोचतो आणि तिथे केंब्रिज विद्यापीठात संशोधन करणाऱ्या त्याच्या प्रिय मित्राला प्रभवला सोबत घेतो. आणि मग सुरू होतं अॅडव्हेंचर ! अल्फा आणि प्रभव बेदीपर्यंत पोचतात, पण त्याच्या खोलीत तो मरून पडलेला आढळतो. त्याने चोरलेली कागदपत्रे गायब आहेत आणि त्याच्या मोबाइलवर एक गूढ मेसेज टाइप केलेला आहे 'फाईंड ब्लू मूर'! बेदीकडची कागदपत्रे कोणी चोरली? शत्रू राष्ट्रांच्या हातात पडण्याआधी अल्फा ती कशी मिळवणार? आणि बेदीने पाठवलेल्या गूढ मेसेजचा अर्थ काय आहे ? ऐका कृणाल आळवेच्या दमदार आवाजात. येथ ऐका नमुना प्रकरण आणि संपूर्ण कथा ऐका स्टोरीटेलवर.

    Show More Show Less
    34 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet